जळगाव मिरर / ११ नोव्हेंबर २०२२
पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत असताना आपले नेहमी पेट्रोल पंपावर भांडण होत असेल कारण पेट्रोलचे भाव वाढत होत आहे, व तुम्हाला जर संशय पेट्रोल पंप चालकावर येत असेल तर तुम्ही त्याच्याशी वाद घालतात . अनेकदा हजारो रुपयाचं इंधन भरूनही गाडी हवा तसा मायलेज देत नाही. त्यामुळे मायलेजमध्ये काही फरक पडला की काय असा प्रश्न पडतो. अनेकदा गाडीत पेट्रोल भरतानाच फसवणूक होते. त्यामुळे डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. फसवणुकीचे अनेक प्रकार देशभरात उघडकीस आले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये, भारतीय तेल आणि वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं होते की ‘पेट्रोल पंप फसवणुकीच्या बाबतीत दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे.’ त्यामुळे गाडीत इंधन भरताना काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो.
काय काळजी घ्याल
– पंपावरील व्यक्तीने मागील वाहनात इंधन भरल्यानंतर फिलिंग मशीनचे रीडिंग 0 वर सेट केलं की नाही याची खात्री करा. जर त्याने तसं केलं नसेल तर तुमची फसवणूक होईल.
– वाहनात कमी इंधन भरलं असं वाटत असेल, तर तुम्ही 5-लिटर मात्रा चाचणी करू शकता. सर्व पेट्रोल पंपांना सरकार प्रमाणित 5 लिटर स्केल आहे आणि कोणत्याही पेट्रोल पंपावर 5 लिटर प्रमाण चाचणी घेणे हा तुमचा अधिकार आहे.
– पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना 5 लिटर प्रमाण चाचणीबाबत विचारा. मशिनमध्ये 5 लिटर भरूनही स्केल पूर्ण भरले नाही, तर समजून जा की फसवणूक झाली आहे. जर तुम्हाला कमी इंधन आढळले तर लगेच कळवा.
इंधन भरताना नेहमी मीटरवर लक्ष ठेवा.
मीटर रीडिंग शून्य आहे की नाही ते तपासा.
इंधन भरेपर्यंत मीटरवर लक्ष ठेवा.
मीटरसह इंधनाच्या नोजलवरही एकदा नजर मारा.