
अमळनेर : विक्की जाधव
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वांनी एकजूट होऊन कामाला लागावे. कोणत्याही परिस्थितीत या संस्थांवर भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेर येथे भाजपातर्फे आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी केले.
या वेळी अनेकांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडला. मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर गिरीश महाजन यांचे प्रथमच अमळनेर नगरीत आगमन झाल्याने त्यांच्या उपस्थितीत बन्सीलाल पॅलेस येथे बैठक तथा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यासह पदाधिकारी उपस्थित होते. सत्कार सोहळ्यानंतर सुरवातीला स्मिता वाघ यांनी क्रीडा संकुलासह निम्न तापी पाडळसरे धरणासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाला केंद्राच्या हिस्स्याच्या निधीसाठी पत्रच दिले नसल्याने निधी उपलब्ध होऊ शकला नाही परिणामी धरणाचे काम अपूर्ण राहिले यासाठी तातडीने पत्र देण्याची मागणी स्मिता वाघ यांनी करीत तालुक्यात इतर कामासाठी देखील निधी मिळावा अशी विनंती ना.महाजन यांच्याकडे केली. सत्काराला उत्तर देताना महाजन म्हणाले की येथील क्रीडा अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर लवकरच संकुलास भरघोस निधी मिळून देण्यात येईल आणि राहिलेले काम पूर्ण केले जाईल, तसेच पाडळसरे धरणास केंद्राच्या निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निधी ही उपलब्ध केली जाईल, याशिवाय ग्रामविकास खाते माझ्याकडे असल्याने माझ्याकडेच असल्याने या खात्या अंतर्गत जेवढा निधी देता येईल तेवढा जास्तीतजास्त निधी या मतदारसंघात नक्कीच देणार अशी ग्वाही देऊन. शेवटी संघटनात्मक बाबींवर कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना भाजप जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, अॅड व्ही. आर. पाटील, युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवी पलांडे (वाघ, ) तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, विधानसभा क्षेत्र शितल देशमुख, माजी सभापती श्याम आहिरे, प्रफुल्ल पवार, भिकेश पाटील, बाळासाहेब पाटील, सरचिटणीस जिजाबराव पाटील, राहुल पाटील, राकेश पाटील, विजय राजपूत, मा जि प सदस्य मीनाताई पाटील, संगीताताई भिल, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुनीता पाटील,संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी तालुकाध्यक्ष भरत पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




















