जळगाव मिरर । २४ नोव्हेबर २०२२
भुसावळ तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप संचालक अं व दक्षता सुनील चव्हाण तसेच विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुक्ल,नाशिक विभाग अर्जुन ओहोळ व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क जळगांव जितेंद्र गोगावले यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सुजित कपाटे राज्य उत्पादन शुल्क ,भुसावळ यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीशीर गुप्त बातमी नुसार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा या ठिकाणी छापा टाकून अवैधरीत्या चालणाऱ्या बनावट देशी दारूची निर्मिती कारखान्यावर छापा टाकून बनावट देशी मद्याची निर्मिती करतांना व बाटलीत भरतांना संशयित तीन आरोपींना अटक करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरील कारवाई दरम्यान एकूण रुपये १७,४३,०२६ मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर बनावट मद्यसाठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात आंतरराज्य मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे याबाबत तपास सुरू आहे.
सदर कारवाई अधीक्षक जितेंद्र गोगावले,सुजित कपाटे विभागीय निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क भुसावळ.सी.एच.पाटील निरीक्षक,भरारी पथक,जळगांव, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार,सतिष पाटील,आनंदा पाटील,शिवनाथ भगत, सोमनाथ शेलार,आमोद भडागे,तसेच विभागीय निरीक्षक पथकाचे जवान नि वाहनचालक सागर क. देशमुख,रघुनाथ सोनवणे,मुकेश पाटील,विपुल राजपूत,गोकुळ अहिरे,सहा.दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ,जवान सर्वश्री. नितीन पाटील,अमोल पाटील, दिनेश पाटील,योगेश राठोड, विठ्ठल हाटकर, नंदू नन्नवरे, विजय परदेशी,धनसिंग पावरा,भूषण परदेशी यांनी यशस्वी रित्या पार पडली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,नाशिक विभाग,अर्जुन ओहोळ आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुक्ल जळगांव जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुजित कपाटे हे करीत आहेत.