जळगाव मिरर । २८ नोव्हेबर २०२२
देशात सुरु केलेली भारत जोडो यात्रा नुकतीच महाराष्ट्रात येवून गेली आता यात्रा हि इंदूर येथे पोहचली असतांना सोमवारी बडा गणपती चौकातून सुरुवात झाली. सनवर रोड मॉडर्न क्रॉसरोडजवळ यात्रेदरम्यान दोन तरूणांनी ‘मोदी..मोदी..मोदी’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. तेव्हा राहुल थांबले आणि म्हणाले- त्यांना यात्रेत बोलवा, तेव्हा घोषणा देणारे ते दोन्ही तरूणांनी पळ काढला.
बडा गणपती चौकापासून निघालेली यात्रा किला मैदानमार्गे जिन्सी चौकातून मरीमाता चौकात पोहोचेलणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. यानंतर ही यात्रा आमदार संजय शुक्ला यांच्या घरासमोरील बाणगंगा मार्गे लवकुश चौकात जाणार आहे. लवकुश चौराहा येथून अरबिंदो हॉस्पिटलकडे जात असताना चौराहाच्या पुढे त्या आमदार संजय शुक्ला यांच्या फॉर्म हाऊसवर जेवणाच्या सुट्टीसाठी थांबतील.
भारत जोडो यात्रा रविवारी महू-राऊमार्गे इंदूर येथे पोहोचली. सोमवारी सायंकाळी या ठिकाणी यात्रेचा मुक्काम होईल. राहुल गांधींचा पहिला मुक्काम पूर्ण झाला. सावर रोडवरील पेट्रोल पंपावर यात्रा थांबली, काही वेळाने पत्रकार परिषद घेणार आहे. राहुल गांधी यांनी रेवती रेंजमध्ये पोलीस आणि पॅरा मिलिटरी फोर्सच्या जवानांची भेट घेतली.