
जळगाव मिरर । ६ डिसेंबर २०२२
जळगाव शहरातील पिंप्राळा तसेच हुडको परिसरातील आझाद नगरातील रस्त्यावरील पक्के अतिक्रमीत बांधकामांवर आज दि ५ डिसेंबर रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे कारवाई करण्यात आली. या अतिक्र्मानामध्ये आझाद नगर येथील 10 तर पिंप्राळा येथील सुमारे 100 बांधकामे काढण्यात आले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते.
मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला आलेल्या तक्रारीवरूंन तसेच रस्ते तयार करण्यासाठी अडथळा ठरणार्या अतिक्रमीत बांधकाम काढण्याची कारवाई सोमवारी करण्यात आली. हुडको परिसरातील आझाद नगरातील रस्त्यावर झालेले सुमारे 10 घरांचे बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख सुनील ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पिंप्राळामधील जाणारा रस्ता नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामूळे अतिशय लहान झाला होता. त्यात या रस्त्याची दुरूस्ती करण्याकामी आज या अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील हे अतिक्रमण पथक, नगररचना विभागाच्या अधिकार्यासह संजय ठाकूर, संजीव पाटील, नाना कोळी, किशोर सोनवणे, उपस्थित होते. मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाकडून बांधकाम पाडत असतांना काही नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढले.




















