
जळगाव मिरर । ७ डिसेंबर २०२२
पारोळा तालुक्यातील एका गावातील ६० वर्षीय वृद्धाच्या घरात दोन अनोळखी इसमांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील लोणी खु.या गावातील रहिवासी नारायण आनंदा पाटील हे आपल्या परिवारासह राहतात. दि ५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नारायण पाटील यांना रात्रीच्या सुमास त्यांच्या पत्नी व नातवाचा ओरडण्याचा आवाज आल्याने ते उठून पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या घरातील दुसऱ्या रुममध्ये २ अनोळखी इसम चोरी करीत असल्याचे आढळून आले त्यांनी यावेळी त्यांच्या मागे पळाले असता ते दोन चोर किचनच्या औट्यांवरून खिडकीतून उडी मारून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चोरीमध्ये त्यांच्या घरातून ४२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर २५ हजार रुपयांची रोकड लंपास झाली आहे. या प्रकरणी त्यांनी पारोळा पोलिसात धाव घेत २ अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी राजू जाधव हे करीत आहेत.





















