
जळगाव मिरर । ८ डिसेंबर २०२२
लहान भावासोबत खेळत असताना अचानक झोक्याचा फास बसून अंशू किरण माळी (99) याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास जुने जळगावात घडली. चिमुकल्याचा मृतदेह पाहून कुटुंबीयांसह नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला.
अंश माली याचे वडील नाशिक येथे कामाला आहेत. तर आई मोलमजुरी करते. बुधवारी सायंकाळी अंशू हा लहान भावासह झोक्याजवळ खेळत होता. खेळता-खेळता अचानक अंशू याला झोक्याचा फास बसला अन् त्याचा जागीच मृत्यू झाला. मावसा घरात आल्यानंतर त्यांना अंशू हा फास लागलेल्या अवस्थेत दिसून आला. लागलीच त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मुलाचा मृतदेह पाहून आईने रुग्णालयात एकच आक्रोश केला.




















