
जळगाव मिरर । ८ डिसेंबर २०२२
जुन्या भांडणातून रामेश्वर कॉलनी येथे सचिन चव्हाण व नितीन राठोड यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मंगळवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तिघांना न्यायालयाने १२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अखेर मंगळवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, गोविंदा पाटील, विकास सातदिवे, संदीप धनगर, किरण पाटील यांनी सम्राट कॉलनी येथून तुषार सोनवणे तसेच रामेश्वर कॉलनीमधून प्रतीक पांडुळे व गुलाब बाबा कॉलनीतून नयन येवले यांना अटक केली. बुधवारी अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.




















