
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शालेयस्तरावर मुलांना स्काऊट तर मुलींना गाईडचे प्रशिक्षण दिले जाते.यासाठी दरवर्षी जिल्हास्तरावर महिला शिक्षकांना
गाईड कॅप्टन प्रशिक्षण भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय जळगाव येथे दि २९ नोव्हेंबर ते २ डिसेंम्बर या कालावधीत पार पडले. यात श्रीमती द्रौ रा कन्या शाळेच्या श्रीमती वाय. एम. पाटील, श्रीमती एन.बी. बाविस्कर, श्रीमती एम.एम. महालपुरे यांनी सहभाग नोंदविला.
सात दिवसीय प्रशिक्षणात योगा प्राणायाम, धावपळीच्या जीवनातून अलिप्त राहून निसर्गावर प्रेम करणे. तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गात उपलब्ध असलेल्या संसाधनांचा उपयोग करून दैनंदिन जीवन कसे सुखकर आणि आरोग्यमय जगता येईल याबाबत उत्तम मार्गदर्शन व स्वानुभव. विविध मैदानी व बौद्धिक खेळ, कृतीमय गाणी, बिना भांड्याचा स्वयंपाक, कृतीयुक्त खेळ, मानसिक क्षमता आधारित खेळ. तसेच दोरीच्या गाठी बांधण्याचे विविध प्रकार , बंधन व प्रथमोपचार बाबत मार्गदर्शन केले गेले.
या गाईड प्रशिक्षणाचा लाभ शाळेत विद्यार्थीनिंना होणार आहे.प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सर्व गाईड शिक्षिकांचे शाळेत सत्कार करून स्वागत करण्यात आले. शाळेचे चेअरमन श्री प्रदीप अग्रवाल यांच्या सह मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी अभिनंदन केले.




















