
अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील माहेर असलेल्या एका विवाहितेला फारकत दिली नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अमळनेर पोलिसात सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कुंभारटेक येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहिता छाया रविद्र कुंभार या दि १ जानेवारी २०१८ पासून ते आजपर्यत २९ वर्षीय विवाहितेस फारकत दे नाही तर तुझ्या आईसह तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत वेळोवेळी विवाहितेच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून दमदाटी केल्या प्रकरणी संशयित आरोपी रविद्र लोटन कुभार यांच्यासह दोन जणावर गुन्हा अमळनेर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेको संजय पाटील हे करीत आहेत.




















