
जळगाव मिरर । ८ डिसेंबर २०२२
शहरातील एका परिसरातून अनोळखी इसमाने मुलीस पळवून नेल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरातून दि ५ रोजीच्या सुमारास आई बहिणीला भेटण्यासाठी गेली असता या संधीचा फायदा घेत अनोळखी व्यक्तीने मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी रविद्र गिरासे हे करीत आहेत.




















