
जळगाव मिरर । ११ डिसेंबर २०२२
राज्यात चर्चेत असलेली निडणूक म्हणजे जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आज लागलेल्या निकालात अमळनेर सोसायटी मतदारसंघातून आ.अनिल पाटील यांनी दणदणीत विजय मिळविला असून यामुळे सहकार पॅनलला अजून एका जागेवर यश लाभले आहे.
जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत अमळनेर सोसायटी मतदारसंघातून आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार स्मीताताई वाघ यांच्यात लढत होती. या लढतीमध्ये आमदार अनिल भाईदास पाटील यांनी विजय मिळविला आहे. त्यांना २४६ मते मिळाली असून स्मिताई वाघ यांना १८४ मते मिळाली. यातून त्यांचा विजय निश्चीत झाला आहे. यामुळे पराग मोरे आणि छायाताई देवकर यांच्या पाठोपाठ सहकार पॅनलला तिसरी जागा मिळाली आहे.



















