
जळगाव मिरर । १२ डिसेंबर २०२२
दुचाकीस्वाराला मालवाहू वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने दीड वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
शेख अली शेख शरीफ (वय दीड वर्ष, रा. फातिमानगर) असे मृत बालकाचे नाव आहे. शेख अमिन शेख आरिफ असे या गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दोघेही दुचाकीस्वार शिरसोली रस्त्यावरच्या शिरसोलीहून शहराकडे येत होते. त्यावेळी एलएस पेट्रोल पंपाजवळ वाहनाने (क्र. एमएच १९, सीवाय ३२९० ) या वाहनाने जोरदार धडक दिली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेख अमीन शेख आरिफ यांना पंधरा दिवसांपूर्वीच मुलगी झाली होती. त्यामुळे मुलीला पाहण्यासाठी रविवारी सकाळी ते त्यांचा भाव मुलगा शेख अली शेख शरीफ याला सोबत घेऊन गेले. मुलीला बघितल्यानंतर पुन्हा दुचाकीने जळगावकडे परतत होते. या धडकेत शेख अली हा रोडवर पडल्याने त्यातच मृत्यू झाला.




















