
अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर – पारोळा रस्त्यावरील बहादरवाडी फाट्याजवळ रविवारी सायंकाळी सात वाजता ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने एक जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
अमळनेर-पारोळा रस्त्यावर बहादरवाडी फाट्याजवळ अमळनेरहून पारोळाकडे मोटरसायकलने नामदेव महारू पाटील (७०, रा. सडावण, ता. अमळनेर) व त्यांच्या मागे सुरत येथील नातेवाईक जयराम दयाराम पाटील हे जात होते. त्याचवेळी पारोळ्याकडून अमळनेरकडे येणाऱ्या विना क्रमांकाच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यात नामदेव पाटील यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेले जयराम पाटील हे जखमी झाले. वाहनधारकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
अशोक आनंदराव पाटील यांनी अमळनेर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.




















