जळगाव मिरर । १४ डिसेंबर २०२२
एरंडोल शहरातील एका परिसरातील ६५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेला व तिच्या सुनेला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करून एकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेल्या ६५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेला व महिलेच्या सुनेला संशयित आरोपी उत्तम अमरलाल शिरवाणी याने जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करीत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि ६ रोजी घडली आहे. या प्रकरणी ६५ वर्षीय महिलेने एरंडोल पोलिसात धाव घेत संशयित आरोपी उत्तम अमरलाल शिरवाणी याच्या विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.
