
धरणगाव : विनोद रोकडे
श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक व बालसंस्कार सेवा ( दि. प्र. ) केंद्र, धरणगाव येथे भव्य.. दिव्या असे एक दिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबीर खूप उत्सहात संपन्न धरणगाव तालुक्यातील सर्व बालसंस्कार साप्ताहिक सेवा केंद्र प्रतिनिधी व सेवेकरी आणि बालसंस्कार विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या सहकाऱ्याने पारपडले.
धरणगावं तालुक्यातील धरणगाव केंद्र धरणगावातली गल्ली गल्लीत तील वस्ती नगर केंद्र पिंप्री खु चिंचपुरा मुसळी बु झुरखेडा बु सोनवद खर्द खु म्हसले बु राजवड नांदेड साळवा साखरे बु विवरे भवरखेडा सर्व साप्ताहिक बालसंस्कार वर्गातील 355 मुलं मुली यांनी या शिबिरात भाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात ओंकार आणि राष्ट्रगीताने सुरुवात करून विविध मार्गदर्शन पर संस्कार करून मुलांना नक्षत्र वाण विषयी माहिती देऊन बोद्धिक क्षमता कार्ड गायन वादन व्यक्तिमत्व विकास प्रश्न मंजुषा आणि गर्भ संस्कार शिशु संस्कार च्या स्टॉल लावून मुलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून बालसंस्कार युवा संस्कार काळाची गरज आहे असे अध्यक्षयी भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष आर पी पाटील यांनी प्रतिपादन केले राकेश मकवाने नाना भाई शाह धरणगावं ता बालसंस्कार प्रतिनिधी चंदाताई पवार प्रविण बडगुजर उज्वला साळुंखे सुलोचना मकवाने यांनी देखील मार्गदर्शन बालसंस्कार शिबिरात केले.
नंतर विविध खेळ स्पर्धा झाल्या जसे कब्बड्डी बुद्धिबळ सुंदर रांगोळी प्रश्न मंजुषा सुंदर हस्ताक्षर रोप वे रनींग वाद विवाद आध्यत्मिक भाषण तर्क वितर्क बोद्धिक कार्ड एक क्षमता असे गटा गटाने ग्रुप करून एका खेळात एकच विद्यार्थी त्याला दुसऱ्या खेळात भाग घेता आला नाही. हि योजना नियोजन बद्ध करून कार्यक्रम यशस्वी झाला त्यामुळे सर्व मुलं मुली यांना विविध खेळ प्रकारात भाग घेता आला.
बालसंस्कार शिबीर स्थळी उपस्थित सर्व मुलं मुली यांना सकाळचा नास्ता दुपारी सुरुची भोजन देण्यात आले. ते सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांनी स्वतः बनवून मुलांना त्यांनीच वाढले. मुलांनी जेवणाचा परमानंद घेतला. विविध स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तजनार्थ मुलं मुली यांना मान्यवराचा हातून बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीते साठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सर्व जेष्ठ सेवेकरी महिला व पुरुष,युवकांनी मोठे परिश्रम घेतले. व कार्यक्रम यशस्वी केला.




















