
जळगाव मिरर १४ डिसेंबर २०२२
शहरातील कोल्हे हिल परिसरातील माऊली नगरातून 3 लाख रुपये किमतीची चारचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील कोल्हे हिल परिसरातील माऊली नगरातील रहिवासी कोमल एकनाथ पाटील(वय 32) यांची मारुती सुझुकी कंपनीची ब्रिझाही एम.एच.14.जे.एम.3628 चारचाकी दि.12 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोमल पाटील यांनी तालुका पोलिसात धाव घेत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.दिनेश पाटील हे करीत आहेत.




















