
जळगाव मिरर । १५ डिसेंबर २०२२
जिल्ह्यातील नेते तथा माजी मंत्री सुरेशदादा जैन हे तब्बल ४ वर्षानंतर आपल्या कर्मभूमीत येत असल्याने त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी दि १४ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास तुफान गर्दी करीत ‘एकच दादा सुरेशदादा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला होता.
रेल्वे स्थानकाला आले दिवाळीचे स्वरूप
शहरातील रेल्वे स्थानक परिसरात कार्यकर्त्यांनी रेड कार्पेट टाकत तर फुलाच्या पाकळ्यांचा वर्षाव या वेळेस होत होता. तर दुसरीकडे ढोलताशाचा गजर तर तरुणासह वयोवृद्धानाहि आला होता जोश सर्वांची दादांना भेटण्यासाठी एकच गर्दी करीत होते. यावेळेस स्थानकाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात होत होती.
दादांनी संवाद साधला !
राजकारणात यायचा सध्या तरी विचार नाही कारण कुटुंबियांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच राजकारणात सक्रिय होणार असल्याची भूमिका माजी आ.सुरेशदादा जैन यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. न्यायालयाने माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर बुधवारी ते जळगावात दाखल झाले. यावेळी बोलतांना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलतांना ते म्हणाले की, तीन वर्षानंतर आपल्या कर्मभूमीत आल्याचा आनंद असून मी पूर्वीपासून आनंदानेच जगत आलो आहे. माझ्या 40 वर्षांच्या राजकीय आयुष्यात अशी गर्दी कधी बघितली नाही. राजकारणात येण्यास कुटुंबियांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे सध्या तरी आशीर्वाद आणि सल्ला देण्याच्या भूमिकेत असणार असल्याचे दादांनी सांगितले. कुटुंबियांसह कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेणार आहे. 30 वर्ष माझ्याकडून जे शक्य झाले ते मी करण्याचा प्रयत्न करीत शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढच्या पिढीने ते सांभाळायला पाहिजे होते, अशी भावनादेखील त्यांनी पत्रकारांसोबत बोलतांना व्यक्त केली.
शहरात विकास नाहीच…
जळगाव शहर हे खड्ड्यांच शहर असल्याची ओळख झाली असल्याचे मी वर्तमानपत्रांसह सोशल मीडियावर वाचत असल्याने मलादेखील वाईट वाटत होत. परंतु माझ्याकडेदेखील आता जादूची कांडी नाही, असे म्हणत त्यांनी राजकारणात येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.



















