
जळगाव मिरर । १६ डिसेंबर २०२२
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे शहरात एका प्रौढ व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनास्थळाहून खून करणारे संशयित फरार झाले आहे. घटनास्थळी मेहुणबारे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेवून चौकशीला सुरूवात केली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील मेहूणबारे येथे आज दि १६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गिरणा विद्यालयाजवळ दगडू वामन गढरी यांच्यावर अनोळखी इसमाने गळ्यावर लोखंडी कोयत्याने वार करीत हत्या केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी त्यांचावर मारेकऱ्याने वार करीत फरार झालेला असल्याची प्राथमिक माहिती आहे तर शेवटचे वृत्तहाती आले तेव्हा घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरु होते.




















