
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातून दोन अल्पवयीन मुलीना वेगवेगळ्या ठिकाणाहून पळवून नेण्यात आले असून दोन तरुणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुणे येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी शहरातील पारोळा रस्त्यावरील साई गजानन नगर मध्ये आपल्या मावशीकडे १२ वी चा फॉर्म भरण्यासाठी आली होती. १० रोजी संध्याकाळी ५ वाजता मुलीने आपल्या मावशीला कपडे शिवून येते असे सांगून घरातून निघून गेली. तिचा शोध घेतला असता ती मिळून अली नाही. मुलीच्या पुणे येथील चाळी मागे असिफ तडवी हा तिला भेटायला दोन तीन वेळा आला असल्याने त्यानेच आमिष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तर दुसरी घटना बहादरपूर नाका येथील मजुरी करणाऱ्या महिलेची साडे सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी इंदिरा गांधी शाळेत १२ वी ला शिकत होती. १६ रोजी सकाळी मैत्रीणीबरोबर शाळेत गेली व शाळेत गेल्यावर मैत्रिणीला तू वर्गात जा मला वही घ्यायला जायचे आहे म्हणून तेथून निघून गेली. ती परत आली नाही म्हणून तिच्या आईने शोध घेतला व घरातील वस्तू तपासल्या असता तिने घरातील ९० हजार रुपये आणि सोन्याचांदीचे दागिने सोबत नेल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी गल्लीतील एक तरुण देखील बेपत्ता झाल्याचे समजले. त्यामुळे सुरेश कोळी तरुणानेच तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय येऊन अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्याने सुरेश कोळी या तरुणा विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















