
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावराला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसेच विधानसभेचे आ.अनिल पाटील यांचे वाढदिवसाचे होर्डिंग लावले होते कॉलेज हे ज्ञान देणारे विद्यापीठ आहे अशा ठिकाणी राजकीय नेत्यांचे होर्डिंग लावून येणारा भावी पिढी खराब करण्याचे काम स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत त्याचा विरोध करत भाजप युवा मोर्चाने प्रताप कॉलेजला आंदोलन करत अनाधिकृत पणे लागलेले होर्डिंग तात्काळ काढायला लावले.
भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, प्रताप कॉलेज राज्यात नव्हे तर देशात नावाजलेले कॉलेज आहे. महाविद्यालय ज्ञानमंदिर असताना या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिले जातात यातून विद्यार्थी घडतात या विद्यार्थ्यांमुळे कॉलेजचे नाव व तालुक्याचे नाव सर्व दूर पसरलेले आहे. आज पर्यंतच्या इतिहासात कॉलेज कॅम्पस मध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार प्रसार झालेला नाही किंवा कॉलेज प्रशासन मंडळाने देखील कॉलजे व विध्यार्थ्यांना बाधा होईल असा राजकीय हस्तक्षेप होऊ दिलेला नाही. परंतु या दोन दिवसात प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे प्रवेशद्वारावर एका विशिष्ट पक्षाचे नेत्यांचे व लोकप्रतिनिधींचे अनाधिकृतपणे होर्डिंग लावण्यात आलेले आहे. या होर्डिंग मुळे विद्यार्थ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो ज्या कॉलेजमध्ये ज्ञानाचे धडे घेण्यासाठी येणारे विद्यार्थी असे राजकीय लोकांचे बॅनर होल्डिंग कॉलेज कॅम्पसमध्ये बघतील तर त्यांचे पुढील भविष्य अभ्यासातून निघून वेगळ्या वळणावर येण्याची शक्यता आहे. कारण अशा प्रकारचे होर्डिंग लावणे म्हणजे एका राजकीय पक्षाचा प्रचार प्रसार कॉलेज कॅम्पस मध्ये करून विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवणे असे दिसून येत आहे. तरी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून कॉलेज प्रशासनाने तात्काळ संबंधित पक्षाचे व लोकप्रतिनिधींचे होल्डिंग कॉलेज कॅम्पस मधून काढावे, या निवेदनावर राहुल चौधरी, साहिल वारुळे, सागर धनगर, निनाद जोशी, कल्पेश पाटील, ललीत पाटील, अमोल पाटील, कमलेश कुलकर्णी यांच्या स्वाक्षरी आहेत.




















