
जळगाव मिरर । १७ डिसेंबर २०२२
आजपर्यत तुम्ही पाहिले असेल कि लग्नामध्ये नववधुस आपले आई वडील गिफ्ट देत असतात, त्यामध्ये कधी कधी दुचाकी, चारचाकी किवा घर पण या वधूच्या बापाने चक्क जेसीबी भेट देत नवरदेवसह आलेल्या पाहुण्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. नवरीचे वडिल सेवानिवृत्त आर्मीमॅन आहेत.
याप्रसंगी नवरी नेहाचे वडील म्हणाले की, मुलीला कार भेट दिली असती तर ती घरासमोरच उभी ठेवावी लागली असती. पण जेसीबी भेट दिल्याने त्यांच्या उत्पन्नाला हातभार लागणार आहे. तर मुलीला देखील कोणाकडे पैसे मागण्याची वेळ येणार नाही. यातून 2 ते 3 जणांना रोजगार देखील मिळणार आहे. या जेसीबीची किमंत सुमारे 30 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
ही घटना सुमेरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देव गावातील आहे. येथील विकास उर्फ योगेंद्र हा हवाई दलात कार्यरत आहे. त्याचे वडील स्वामीदिन चक्रवर्ती यांनी योगेंद्रचे लग्न नेहाशी ठरविले होते. माजी सैनिक परसराम प्रजापती यांची नेहा मुलगी आहे. नेहा स्पर्धा परीक्षेची तयारी करित आहे. 15 डिसेंबर रोजी शिव लॉन गार्डन गेस्ट हाऊसमध्ये नेहा-योगेंद्रचे लग्न थाटामाटात पार पडले. मुलीला निरोप देताना वडिलांनी तिला भेट म्हणून चक्क जेसीबी भेट दिला. तेव्हा सर्व पाहुणे मंडळी चकित झाले. नवरदेवाचे वडील स्वामीदीन म्हणाले, ‘मुलीच्या वडिलांनी जेसीबी देण्याचे सांगितले होते. आम्हीही त्याच्याशी सहमत झालो. भेटीतील बुलडोझर पाहून पाहुणेमंडळी देखील आश्चर्यचकित झाले. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढायला सुरुवात केली.





















