
जळगाव मिरर । १७ डिसेंबर २०२२
जिल्हा दूध संघाच्या चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संचालकांच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा रविवार, १८ रोजी होणार आहे.
जिल्हा दुध संघाची निवडणूक झाल्यानंतर चेअरमनपदाची निवड १८ आज होत असल्याचे त्या पाश्वभूमीवर शनिवारी नुतन संचालकांची बैठक झाली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. रात्री ११ वाजेपर्यत हि बैठक चालली. जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत व मुक्ताई नगर मतदार संघातून मंदाकिनी खडसे यांना त्यांच्याच मतदार संघातून आव्हान देत विजय मिळवलेल्या मंगेश चव्हाण यांचीच चेअरमनपदी निवड होणार असे संकेत होते. त्यानुसार चव्हाण यांच्याच नावावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती आहे.




















