जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२६
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे गेल्या कित्येक दिवसांपासून बोदवड फत्तेपूर राज्य मार्ग ४६ या रस्त्याचे काम कासवगतीने सुरु आहे. रांजणी बेटावद रस्त्यावर ढंपर मागे घेत असतांना रस्त्यावर काम करणाच्या परप्रांतीय मजुराला जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्य झाल्याची घटना दि. २६ रोजी रात्री आठ वाजेचे सुमारास घडली. राजनी बेटावद रस्त्यादरम्यान या कंपनीचा कॅम्प आहे.

तेथून एक किमी अंतरावर रांजणी गावाकडे ढंपर (एमएच. ०५ जी.ए.३०६५) मागे घेत असतांना चालकाने रस्त्यावर काम करणाऱ्या संतोषकुमार हरिनंदनसिंह (वय .३९ रा. परसागढी जि. सुपौल बिहार) या परप्रांतीय मजुराला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अवधेश गोनर पासवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढंपर चालक आकाश प्रल्हाद चोभे (रा. सारगाव ता. जामनेर) याचे विरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सपोनि अंकुश जाधव यांचे मार्गर्शना खाली हेड काँ. गणी तडवी पोकॉ मुकेश पाटील करत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह बिहारमधील मृताच्या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आला.




















