
जळगाव मिरर । १८ डिसेंबर २०२२ ।
जळगाव जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालत येथे झालेल्या कार्यक्रमात श्रमजिवी कामगार ऑटो रिक्षा फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल जळगांव जिल्हा विधी सहाय्यक चेअरमनचे प्रमुख न्यायाधिश ए. ए. के. शेख यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सदर प्रसंगी स्कार्फ संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अॅड. गोविंद तिवारी, सचिव देविदास भडंगर ज्येष्ठ पत्रकार संजय निकुंभ, महेंद्र भदाणे, प्रकाश दिक्षीत, दशरथ सोनवणे, मुरलीधर भडंगर, बाळु विधुर, विजय जाधव, कैलास कोळी, भगिरथ सैनी, विकास पाटील, राजेंद्र पवार, सुनिल जोशी, इत्यादींचा गौरव करण्यात आला. न्यायमुर्ती ए.ए.के. शेख यांनी मनोगत व्यक्त करतांना युनियन व रिक्षा चालकांना शुभेच्छा देवुन आभार मानले, जळगांव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.




















