
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
नुकतीच १७ डिसेंबर रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीस ग्राहक पंचायतीचे संस्थापक स्वर्गीय बिंदू माधव जोशी व आद्य दैवत स्वामी विवेकानंद यांच्या फोटोस मल्ल्यार्पण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने २४डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मध्य महाराष्ट्र प्रांताकडून आलेल्या निर्देशानुसार ग्राहक जागृती करता पंधरवडा साजरा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
त्यात प्रमुख्याने शाळा महाविद्यालय व सरकारी कार्यालयांना व व बँकेला भेटी देण्याचे ग्राहकांच्या येणाऱ्या तक्रारींवर व समस्येवर उपाययोजना करणे बाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी लेखक,कवी व ग्राहक पंचायतीचे सक्रिय कार्यकर्ते श्री गोकुळ बागुल यांची कविता गुजरात राज्यात चौथीच्या वर्गासाठी मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे त्यानिमित्ताने त्यांच्या शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दोन महिला सदस्यांनी सेंट्रल बँकेच्या कर्मचारी सौ अर्चना पाटील व रेणुका ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ सुनिता मनीष करंजे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरचे सभासत्व स्वीकारले आणि त्यांचेही यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अमळनेर तालुका ग्राहक पंचायतीच्या अध्यक्ष एडवोकेट भारती अग्रवाल सचिव सौ कपिल मुठे जिल्हा सहसंघटक मकसूद बोहरी, जिल्हा बँकिंग व सायबर प्रमुख विजय शुक्ल, जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख सुनील वाघ ,खदीर सादिक, सौ ज्योती भावसार , सौ अंजू ढवळे आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते अशी माहिती मेहराज बोहरी कळवितात.




















