आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतीय बाजारात आज सोमवारी १९ डिसेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून महागाई मोजण्यासाठी सोन्याच्या किंमती हे एक मानक आहे असं आपण मानतो. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे ही महत्वाची गुंतवणूक समजली जाते. कारण त्यातून चांगला परतावा मिळतो. आज 22 कॅरेटचा 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,750 तर 24 कॅरेटचा 54,260 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 695 रुपये आहे.
चेन्नई – 55,160 रुपये
दिल्ली – 54,260 रुपये
हैदराबाद – 54,110 रुपये
कोलकत्ता – 54,110 रुपये
लखनऊ – 54,260रुपये
मुंबई – 54,110 रुपये
नागपूर – 54,110 रुपये
पुणे – 54,110 रुपये
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.