
जळगाव मिरर । २० डिसेंबर २०२२
शहरातील बळीराम पेठेतील एका दुकानात रात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बळीराम पेठ परिसरातील संत कवरराम मार्कटमध्ये गोवर्धन कलेक्शन नावाने असलेले कापड दुकान दि १८ रोजीच्या मध्यरात्री अनोळखी चोरट्यांनी दुकान फोडून १ लाख ४५ हजार रुपये चोरून नेले आहे. हि घटना दि १९ रोजी सकाळी दुकान मालक राजा दयालदास पारवानी(वय ५४) यांना लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ शहर पोलीस स्थानक गाठत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोउनी सर्जेराव क्षीरसागर हे करीत आहेत.




















