
जळगाव मिरर । २० डिसेंबर २०२२
भाऊसाहेब राऊत विद्यालयात निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राजेश जाधव यांनी गाडगे बाबा यांच्या जीवनकार्या विषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एल.एस.तायडे हे होते तर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.एस.एम.रायसिंग, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.पी. व्ही.बाविस्कर, व इतर सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख योगराज सोनवणे यांनी तर आभार विनोद कोळी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता संत गाडगेबाबा यांचे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाने झाली दुपार सत्रात विद्यालय परिसरात स्वछता मोहीम राबविण्यात आली.




















