
जळगाव मिरर । २१ डिसेंबर २०२२
शहरातील एका ठिकाणी कार्यरत असलेल्या महिलेला एका कर्मचारीने फेसबुकवर अश्लील संदेश पाठविल्या प्रकरणी त्या कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेल्या एका महिला कर्मचारी दि १९ रोजी पासून शहरातील डेपो आगारातील सहायक यात्रिक विजय पाटील(रा.खोटे नगर, जळगाव) याने फेसबुकवर महिलेला अशील संदेश पाठवून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली, या प्रकरणी महिलेने जिल्हा पेठ पोलीस स्थानक गाठत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढी तपास पोना.राजेश पदमर हे करीत आहेत.




















