
जळगाव मिरर । २१ डिसेंबर २०२२
राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून मंगळवार २० रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने संत कंवरराम हिंदी प्राथमिक पाठशाला येथे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हेल्थ चेकअप आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची इयत्ता पहिली ते चौथी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोग तज्ञ डॉ. गौरव प्रकाश महाजन प्रमुख अतिथी डॉ .प्राची गौरव महाजन तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ ,डॉ नीलिमा सेठिया व सौ.मनिषा पाटील (ग्राहक पंचायत महाराष्ट्र) उपस्थित होत्या .डॉ. हिरम, डॉ. प्राची महाजन यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे – सुषमा चव्हाण, रेणुका हिंगू , मरियम बुगडवाला, किरण जोशी, डॉ. अविनाश सोनगीरकर , महेश चावला, गुरुबक्ष जाधवानी ,अंतिम पाटणी , शशी शर्मा आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती . किर्ती दर्शनलाल कावणा तसेच श्रीमती.सुषमा निळकंठ गायकवाड ,श्री मयूर बाळासाहेब देशमुख ,श्रीमती नीता गोपालराव वानखेडकर ,श्रीमती .स्वप्ना संतोष पवार या सर्व शिक्षकांनी प्रयत्न केलेत. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.




















