देशात सुरु असलेल्या महागाई व दिल्ली सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. आज सोन्याचा दर १०५ रुपयांनी तर चांदीचा दर ८३३ रुपयांनी घसरला आहे. या घसरणीनंतर मंगळवारी दिल्लीत सोन्याचा भाव 56,160 रुपये प्रति दहा ग्रॅम होता.
चांदीचा दर आज 68,725 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने प्रति औंस 1880 डॉलरची पातळी ओलांडली आहे. सोन्याने पुन्हा आठ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. स्वीडन रिस्कबँक परिषदेत फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या विधानाकडे बाजाराची नजर होती. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पॉवेल व्याजदर वाढीबाबत स्पष्टता देऊ शकले नाहीत. त्यामुळे फेड व्याजदर कमी करणार यावर बाजाराचा विश्वास वाढला.
यामुळे डॉलर निर्देशांकात घसरण झाली आणि तो 103 च्या खाली घसरला. सध्या डॉलर सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. त्याचबरोबर सोन्या-चांदीच्या दरातही तेजी आली. सोन्याने प्रति औंस 1880 डॉलरची पातळी ओलांडली. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,440 रुपये तर 24 कॅरेट साठी 56,120 रुपये आहे तर चांदीच्या दर कमी झाला असून आज 10 ग्रॅम चांदी 718 रूपये आहे.
चेन्नई – 57,120 रुपये
दिल्ली – 56,280 रुपये
हैदराबाद -56,120 रुपये
कोलकत्ता – 56,120 रुपये
लखनऊ – 56,280 रुपये
मुंबई – 56,120 रुपये
नागपूर – 56,120 रुपये
पुणे – 56,120 रुपये
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.