
जळगाव मिरर । १४ जानेवारी २०२३ ।
पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवले. त्याने महाराष्ट्र केसरी जिंकली.
शिवराज राक्षेने गतवेळच्या महाराष्ट्र केसरीमधून माघार घेतली होती. त्याला खांद्याची दुखापत झाल्याने त्याने माघार घेतली होती. तो गतवेळी देखील महाराष्ट्र केसरीच्या संभाव्य विजेत्यांमध्ये गणला जात होता. अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचे त्याचे स्वप्न 2023 मध्ये पूर्ण झाले. शिवराजला महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा आणि 5 लाख रूपये बक्षीस रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर शिवराजला महिंद्रा थार ही एसयुव्ही देखील पटकावली.






















