जळगाव मिरर । ५ फेब्रुवारी २०२३।
देशातील अर्थसंकल्प नुकताच सादर झाला पण आज हि पेट्रोलचे दरात चढ उतार होत आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. आज दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लीटर राहिला, तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर राहिला. सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेऊन दररोज दर ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज संध्याकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारित करतात.
कोलकातामध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत आता 106.03 रुपये आहे. तर 1 लिटर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आता 1 लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आहे. तर 1 लिटर डिझेलची किंमत 94.27 रुपये प्रति लीटर आहे.
चेन्नईमध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत आता 102.63 रुपये आहे. तर 1 लिटर डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर आहे.