जळगाव मिरर / ६ फेब्रुवारी २०२३
राज्यात मोठ्या प्रमाणात लाच घेताना अनेक अधिकारी पासून तर त्यांच्या पंटरपर्यंत एसीबी अटक करीत आहे. तर आज झालेली कारवाई हि सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे, हि घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे.
जलसंधारण विभागातील एका अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एसीबीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. ऋषिकेश देशमुख (उपविभागीय अधिकारी वैजापूर जलसंधारण विभाग) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असल्याचं समोर आलं आहे.
ऋषिकेश देशमुख हे जलसंधारण विभागात वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान जलसंधारण विभागातील एका कामाची टक्केवारी म्हणून, त्यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली होती. मात्र तक्रारदार यांची लाच घेण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. दरम्यान एसीबीने लावलेल्या ट्रॅपनुसार, देशमुख यांना साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे.