जळगाव मिरर / ९ फेब्रुवारी २०२३
जळगाव जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री चषक जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेत जिल्ह्यातील 32 संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे उदघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, उपजिल्हा प्रमुख स्वप्निल परदेशी, उपमहानगरप्रमुख गिरीश सपकाळे, युवासेना जिल्हा सरचिटणीस सागर हिवराळे, शंतनू नारखेडे, हितेश ठाकरे, चेतन कापसे, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे प्रशांत कोल्हे यांची उपस्थिती होती प्रारंभी रायसोनी विद्यालयाचे संगीत विभागातर्फे स्वागतगीत व महाराष्ट्र गीत सादर केले राज्य खेळाडूंनी क्रीडाज्योत मैदानात आणली त्यावरून मुख्य क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली जिल्हाप्रमुख निलेशभाऊ पाटील यांनी मैदानाचे पूजन करून श्रीफळ वाढविले तसेच खेळाडूंचा परिचय करुन घेतला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हाप्रमुख निलेश पाटील, उपजिल्हाप्रमुख स्वप्निल परदेशी, युवासेना जिल्हा सरचिटणीस सागर हिवराळे यांचे हस्ते झाले याप्रसंगी जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष प्रा ईकबाल मिर्झा, कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, सल्लागार प्रा हरिश शेळके, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापक विठ्ठल पाटील,जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांची उपस्थिती होती स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी स्कुल जामनेर विजयी, बी यु एन रायसोनी उपविजयी तर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत पंच म्हणून प्रा समीर घोडेस्वार, प्रकाश सपकाळे, प्रसन्न जाधव,धीरज पाटील, निलेश पाटील, सचिन महाजन, विजय विसपुते, तुषार पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेतील सहभागी संघांना अल्पोपहार व फळे वाटप करण्यात आली.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी युवासेनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.