• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 3, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ मार्च २०२६

राज्यातील सत्तांतरानंतर सुरू झालेल्या पक्षांतराच्या मालिकेत आणखी एक मोठी नोंद होत आहे. जिल्ह्यातील माजी खासदार तथा उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ६ मार्च रोजी मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील एका सहकारी बँकेकडून थकीत कर्जापोटी पाटील यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा शिंदे गटात होणारा प्रवेश हा दबावाखालील निर्णय तर नाही ना, अशी कुजबुजही सुरू आहे. मात्र, पाटील समर्थकांच्या मते हा निर्णय पूर्णपणे राजकीय भवितव्य आणि मतदारसंघातील विकासकामांच्या दृष्टीने घेतला जात आहे.

२०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आलेल्या उन्मेष पाटील यांना २०२४ मध्ये उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करत नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चाळीसगाव मतदारसंघातून उमेदवारीही लढवली; मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर त्यांच्या राजकीय सक्रियतेत काहीशी घट दिसून येत होती. दरम्यान, गेल्या महिन्यात त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराची शक्यता अधिक बळावली होती. अखेर ६ मार्च रोजी होणाऱ्या शक्तीप्रदर्शनासह ते शिंदे सेनेत अधिकृत प्रवेश करणार आहेत.

पाटील यांच्या प्रवेशामुळे चाळीसगावसह जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. शिंदे सेनेत आधीच प्रभावी असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात गट-तट निर्माण होणार की पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

तसेच मित्रपक्ष भाजपची भूमिका आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रवेशाचा परिणाम दूरगामी ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आधीच राज्यभरातील अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शिंदे सेनेत प्रवेश केला असताना, माजी खासदाराचा होणारा हा प्रवेश संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. ६ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या शक्तीप्रदर्शनाकडे राज्याचे राजकीय लक्ष लागले असून, या प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group