
जळगाव मिरर / १४ फेब्रुवारी २०२३ ।

शहरातील एका तरुणावर दुचाकी लावण्याच्या कारणावरून तीन ते चार तरुणांनी त्याला मारहाण करीत चाकू मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील धांडे नगरात वास्तव्यास असलेला आर्यन अजय पाटील हा तरूण शिकवणीसाठी मित्राला घ्यायला गेलेल्या तरुणाच्या पाठीत शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ सोमवारी संध्याकाळी सात वाजता घडली. आर्यन अजय पाटील या महाविद्यालयीन तरुणाचा डी-मार्टजवळ तर त्याच्या मित्राचा सेंट जोसेफ शाळेजवळ क्लास होता. तो त्याला घ्यायला शाळेजवळ संध्याकाळी सात वाजता दुचाकीने गेला होता. या ठिकाणी आठ ते दहा टारगट मुले एका तरुणाला मारहाण करत होते. दुसऱ्या उभ्या असलेल्या गटातील तरुणाने चॉपरने हल्ला केला. आर्यनच्या पाठीत कोणी तरी चॉपर मारून त्याला जखमी केले. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील हे करीत आहेत.





















