
अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर शहरातील एका परिसरातून चोपडा तालुक्यातील पंचक गावातील रहिवासी असलेल्या वृद्धाची दुचाकी लंपास झाल्याची घटना घडल्याने अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील पंचक येथील रहिवासी वसंत पाटील (वय ४७) यांच्या मालकीची दुचाकी अमळनेर शहरातील धुळे रोडवरील अंबर हॉटेलच्या पुढे असलेल्या एका घराच्या मागील बाजूस लावलेली असतांना एम.एच.१९.सी.एम.७७०२ या क्रमाकांची अनोळखी चोरट्यांनी दि २० रोजी भरदिवसा चोरून नेल्याची घटना घडल्याने त्यांनी तत्काळ अमळनेर शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय पाटील हे करीत आहेत.





















