
जळगाव मिरर / ६ मार्च २०२३ ।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरतर्फे गॅस सिलेंडर दरवाढी तसेच कांदा व कापसाला भाव मिळावा म्हणून महागाईची होळी साजरी करीत केद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
दिनांक ६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस महानगर व युवक च्या वतीने केंद्र सरकार राज्य सरकार जुमलेबाज सरकार विरोधात जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय आकाशवाणी चौक याठिकाणी 50 खोके लाऊन गॅस सिलिंडरचदरवाढीच्या व कापसाला व कांद्याला भाव वाढून मिळण्यासाठी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला व 50 खोके लाऊन महागाई विरोधातील होळीचे दहन जिल्हाध्यक्ष ऍड भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी , युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी , इब्राहिम तडवी सर , राजूभाऊ मोरे , किरण राजपूत , रमेशजी बाऱ्हे , सहील पटेल , रफिक पटेल , ललित नारखेडे ,चेतन पवार , कुंदन सूर्यवंशी ,सचिन साळुंखे , सिद्धार्थ गव्हाणे , हितेश जावळे ,अशोक सोनवणे ,राहुल टोके , विशाल देशमुख आदी उपस्थित होते





















