
जळगाव मिरर / ११ मार्च २०२३ ।
अयोध्या नगर येथे ११ मार्च शनिवार रोजी झेप प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त रक्तगट / हिमोग्लोबिन तपासणी व रक्तदान शिबीर सकाळी १० ते १ यावेळेत आयोजित करण्यात आले होते. तसेच या शिवीरात मोठया संख्येने परिसरातील महिलांनी व पुरूषांनी सहभाग नोंदवला त्यात परिसरातील एकुण ५४ महिलांचे रक्तगट व हिमोग्लोबिन तपासण्यात आले असुन १४ शिवभक्तांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले.
सदर कार्यक्रमासाठी माधवराव गोळवलकर रक्तपिढी जळगाव यांचे सहकार्य लाभले झेप प्रतिष्ठानच्या सदस्या सौ हर्षदा पाटील सौ दिपाली पाटील सौ मनिषा भोसले सौ सविता पाटील सौ छाया पाटील यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केला. तसेच या कार्यक्रमासाठी झेप प्रतिष्ठानचे सचिव अविनाश पाटील संदिप मांडोळे संभाजी ब्रिग्रेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत महानगर अध्यक्ष संदिप पाटील हर्षल वाणी जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र निकम जनहितकक्ष मनसे योगेश पाटील रवि पाटील मनोज लोहार अक्षय चौधरी शुभम चौधरी विठ्ल कबाडे यांचे अनमोल सहकार्य लाभले.




















