जळगाव मिरर स्पेशल
जळगाव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात महत्वाची मानल्या जाणाऱ्या दोन निवडणुकीत चाळीसगावचे भाजपचे आ.मंगेश चव्हाण हे ‘गेम चेंजर’ च्या भूमिकेत दिसून आले आहे. त्यामुळेच दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्वाची मानली जाणारी निवडणूक जिल्हा दूध संघात गेल्या कित्येक वर्षपासून ‘खडसेराज’ असताना सुद्धा भाजपने यंदाच्या निवडणुकीत चालीसगवचे आ.मंगेश चव्हाण यांच्याकडे निवडणुकीची धुरा दिल्याने आ.चव्हाण यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवीत, आ.खडसे यांच्या पत्नी मंदाकिनीताई खडसे यांच्या दारुण पराभव करीत आ.चव्हाण पहिल्यांदा जिल्हा दूध संघात प्रवेश केला तर जिल्हा दूध संघातील दूध, लोणीचे सारेच हिशोब आ.चव्हाण यांनी घेतल्याने जिल्हा दूध संघातील अधिकारीना थेट जेलची वारी देखील या काळात करावी लागली. त्यामुळे दूध संघातील ‘खडसेराज’ संपुष्टात आले. या निवडणुकीत मंत्री महाजन व मंत्री पाटील यांनी आ.मंगेश चव्हाण यांच्यावर विश्वास टाकत जिल्हा दूध संघाची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली आहे.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली जिल्हा बँकेचे निवडणूकिकडे बघितले जाते. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेत्यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या चेअरमन व व्हा.चेअरमनपदाची निवडणूक नुकतीच झाली , यामध्ये महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे नेते एकनाथराव खडसे यांना विजयाची पूर्णपणे खात्री असल्याने ते गाफील राहिल्याचा फायदा भाजपसह शिवसेनेने(शिंदे गट) घेऊन महाविकास आघाडीत बिघाडी करण्यात ते यशस्वी झाले. त्यातच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भाजप व शिवसेनेच्या लोकांनी मतदान करीत महाविकास आघाडीला जिल्हा बँकेच्या चेअरमन पडपासून दूर ठेवत आ.मंगेश चव्हाण यांनी आपली रणनीती वापरत बँकेच्या चेअरमनपदी संजय पवार तर व्हा.चेअरमनपदी अमोल पाटील यांची वर्णी लागली अर्थात यामध्ये मंत्री महाजन यांच्यासह मंत्री पाटील यांचे पाठबळ होतेच. पण अदृश्य लोकांनी मतदान केल्याचे मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना खुलासा केला होता. अगदी सहकार क्षेत्रातील दोन निवडणूकित आ.एकनाथराव खडसे यांचे दोन्ही गड पाडण्यात आ.मंगेश चव्हाण यांना यश आल्याने या निवडणुकीचे देखील आ.मंगेश चव्हाण हेच ‘गेम चेंजर’ च्या भूमिकेत दिसून आले. दरम्यान सहकार क्षेत्रातून शेतकऱ्यांना न्याय कोण चांगले देऊ शकतो ? हे आता येणाऱ्या काळातच दिसणार आहे.