जळगाव मिरर / १५ मार्च २०२३ ।
राज्यातील शिंदे व ठाकरे गटात सुरु असलेले राजकारणाने अगदी सर्व सामान्यांना लाजवेल अशा बोलीभाषेचा वापर सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेली मिरवणुकीत जो व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
राज्यात सध्या मुका घ्या मुका सिनेमा सुरु आहे. मात्र या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करत आहे. त्यांचा काय संबंध आहे. सार्वजनिक कार्यक्रमात मुका घ्यायला आम्ही सांगितले होते का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ व्हिडीओ प्रकरणावरुन संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, सध्या मुंबईत मुका घ्या मुका प्रकरण सुरु आहे. आज दादा कोंडके हवे होते. तो सिनेमा त्यावेळी फार गाजला होता. मात्र या प्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करत आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे. सर्वात आधी या व्हिडीओची चौकशी व्हायला हवी, मॉर्फिंगचा प्रश्नच येत नाही. प्रकाश सुर्वेंच्या मुलाने हा व्हिडीओ शेअर केला, त्याच्यावर कारवाई झाली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संजय राऊत म्हणाले, तुम्ही मुके घ्या किंवा मिठ्या मारा, मात्र आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्यांवर खरेतर गुन्हा दाखल करायला हवा, असेही राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 100 शक्तिशाली युवकांमध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव आले आहे. हा महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आदित्य ठाकरे यांनी विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याची जागतिक पोचपावती मिळाली आहे.