
जळगाव मिरर / २३ मार्च २०२३ ।
राज्यातील मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेत्री ‘केतकी चितळे’ ही तिच्या अभिनयापेक्षा आपल्या आयुष्यातील वेगळ्याच कारणाने नेहमी चर्चेत असते. तर तिच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
केतकीच्या काही अशाही पोस्ट आहेत ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. आता पुन्हा एकदा तिने आपल्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये केतकीने तिच्या स्टाइलने सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया आकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे.
मात्र, आता केतकीचे ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात देखील केली आहे. यावेळी केतकीने पुण्यात जाऊन थेट पुणेकरांचीच फिरकी घेतली आहे. हिंदू नववर्षाच्या पुणेकरांनी इंग्रजीतून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील लोकांना स्वघोषित मावळे म्हणत अभिनेत्री केतकी चितळेनं त्यांचे कान टोचले आहेत.





















