जळगाव मिरर / २६ मार्च २०२३ ।
राज्यातील मनसेचे नेते व अवघ्या काही दिवसातच राज्यातील कार्यकर्त्यामध्ये उत्साह भरणारे म्हणून चर्चेत असलेले ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्या प्रकरणी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी नौपाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देणारी क्लिप व्हायरल होत असल्याचे मनसेने कार्यकर्त्यांनी म्हटंल आहे या आधारे तक्रार दाखल केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मशीद, मजार उभारणीकडे व्हिडीओच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं होते. त्यानंतर तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करत माहिम आणि सांगलीतील अनधिकृत मजारवर कारवाई करून उध्वस्त केले. त्यानंतर अविनाश जाधव यांनी मुंब्रा येथील वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्या असल्याचं उघडकीस आणलं होत. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने संबंधित ठिकाणची पाहणी केली होती. त्यानंतर अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक म्हणत आहेत की,
अविनाश जाधव यांना, ” हम उसे जिंदा नही छोडेंगे, कोई गुस्ताख छुप न पाएगा, हम उसे ढुंड ढुंड के मारेंगे … ” बॉयकॉट अविनाश जाधव अशा आशयाच्या या व्हिडीओतील धमकी देणारी व्यक्ती दिसत नाही, असे मनसेने म्हटले आहे. याआगोदर देखीन मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला होता. शिवाजी पार्क परिसरात फिरण्यासाठी गेले असता सकाळच्या सुमारास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा हल्ला झाला होता. यामध्ये त्यांचा हात मोडला होता.