जळगाव मिरर / २३ एप्रिल २०२३ ।
राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांच्यामुळे चर्चेत होते मात्र दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जळगाव जिल्ह्यात येत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पाचोरा येथे होणाऱ्या सभेत घुसण्याचे आव्हान दिल्यानंतर जिल्ह्यातील शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
या सभेत शिंदे गटाचे शेकडो शिवसैनिक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या चेहऱ्याचा मुखवटा धारण करून जाणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यासह सरीता माळी-कोल्हे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत रविवारच्या ठाकरे यांच्या सभेत शेकडोंच्या संख्येने जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी गुलाबराव पाटील यांच्या चेहऱ्याचे मुखवटे छपाईसाठी देण्यात आले आहेत. सुमारे २५० चारचाकी वाहनातून शिवसैनिक पाचोऱ्याला जाणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. त्यामुळं आज पाचोरा शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.