जळगाव मिरर | ८ मे २०२३
गेल्या काही दिवसांपासून राजकरणात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेने चांगलाच धुमाकूळ घातला होता. पक्षाचे कार्यकर्त्यांसोबतच सत्ताधारी सुद्धा गोंधळात पडले होते. अखेर या चर्चांना पुर्णविराम लागला जरी असला तरी अजित पवार हे त्यांचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. काही लोकांना फक्त काम करण्यात आवड असते, तर काहींचा वृत्तपत्रात बातमी छापून आणण्याकडे कल असतो. अजित पवार हे मीडिया फ्रेंडली नाहीत, हे बऱ्याचशा पत्रकारांना माहीत आहे, अशा शब्दांत अजित पवार यांच्याविषयीच्या चर्चांना खुद्द शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.
शरद पवार बारामतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, काही लोक असा प्रचार करतात. ती त्यांच्या कामाची पद्धत असते. अजित पवार यांचा अप्रोच हा सातत्याने काम करण्याकडे आहे. ते फार ‘मीडिया फ्रेंडली’ नाहीत, हे तुम्हालाही माहिती आहे. काही लोक काम करणारे असतात, तर काही लोक फक्त वृत्तपत्रांत नाव येण्यासाठी काम करणारे असतात. अजित पवार यांना वृत्तपत्रांत नाव कसे येईल, याची कधीही चिंता नसते. त्यांना आपण हातात घेतलेले काम पूर्ण कसे होईल याची चिंता असते. तुम्ही जे म्हणता, असे काही नाही. ते त्यांचे काम करत आहेत आणि त्यांचे काम राष्ट्रवादीसाठी आणि राज्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे.
परस्परविरोधी, भिन्न विचारांचे राजकीय पक्ष आघाडी करून सरकार स्थापन करतात, तेव्हा किमान समान कार्यक्रम तयार केला जातो. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने CMP चा विचार करायचा तर, हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना आणि पूर्णपणे वेगळी-धर्मनिरपेक्षतेची विचारधारा मानणारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांना बांधून ठेवणारा धागा म्हणजे किमान समान कार्यक्रम, असं म्हणता येईल. आपापल्या विचारधारा थोड्या बाजूला ठेवून जनकल्याणाचे विषय, विकासकामं पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने आखलेली सर्वांना मान्य असेल अशी रूपरेषा म्हणजे किमान समान कार्यक्रम !
