
जळगाव मिरर | १३ मे २०२३
कर्नाटक राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागला असून यात कॉंग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून भाजपला विरोधी गटात बसविण्यात कॉंग्रेस यशस्वी झाला आहे. या मिळविलेल्या यशाबद्दल देशभर कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात कामाला लागून फटाके फोडून जल्लोष करीत आहे. यावर आज जळगाव शहरात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी कॉंग्रेससह ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने पूर्णपणे स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर राज्याचे ग्रामविकास व क्रिडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी आपल्या पक्षाच काय ते बघावे, आणि भविष्यात कुठ रहाल त्याचा शोध घ्यावा. बाहेर तुमच काहीच राहिल नसून शेजार्याला पोरग झाल म्हणून आपण पेढे वाटायचे, आपण वांझोटे आहात का? अशी जहरी टिका ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर केली.
यावेळी निकालावर बोलतांना ना. महाजन म्हणाले की, कर्नाटक मध्ये आम्हाला अपेक्षा होती त्या पद्धतीनं काम झालेलं नाही. आम्ही कमी पडलो का कमी पडलो याचा नक्की शोध घेणार असून इतक्या कमी जागा आपल्या येतील याची आम्हाला अपेक्षा नव्हती. या सार्या बाबींचं आत्मपरीक्षण करू कारणमीमांसा करणार आहोत. हनुमानाची गदा पाहण्यापेक्षा तुमचा धनुष्यबाण कुठं आहे ते बघा. तुमचा धनुष्यबाण तुमच्याकडे राहिलेला नाही, तुमचे आमदार खासदार तुमच्याकडे राहिले नाहीत महाराष्ट्रात तुमचं काय आहे ते दाखवा, बाहेर तर तुमचं काहीच नाही. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना सारखी झाली असल्याची टिका देखील ना. महाजन यांनी केली.





















