पाचोरा : प्रतिनिधी
आईच्या संगनमताने दोन मुलांनी चक्का आपल्या वडिलांचाच चॉपरच्या सहाय्याने खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पाचोरा शहरातील भास्कर नगरात रविवारी घडली. संजय खेडकर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
भास्कर नगर येथे वास्तव्यास असलेला मयत संजय बंकट खेडकर (वय ४७) यांचे आपल्या पत्नीशी नेहमी काहीना काही किरकोळ कारणांवरून भांडण होत असे. शनिवारी नेहमीप्रमाणे रात्रभर पती पत्नीमधे भांडण झाले. दरम्यान नेहमीच्या त्रासाला कंटाळून मुले मनोज संजय खेडकर (वय २१), प्रतिक संजय खेडकर (वय २३) व पत्नी वंदना संजय खेडकर (वय ४३) यांनी चाकूने वार करुन संजय खेडकर यांची हत्या केली. माझा पती संजय हा माझ्या चारीत्र्यावर संशय घेत असून मला घरात येण्यासाठी मज्जाव करीत आहे व तू जर घरात आली तर मी तूला चाकू खूपसून मारुन टाकेल नाहीतर मी स्वतः हा चाकू खूपसून मारुन जाईल अशी धमकी देत असून त्यांचेपासून माझे जिवास धोका असल्याने त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करा असे सांगितले. या रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या प्रकरणी महिलेला व दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली असल्याचे समजते.