भुसावळ : प्रतिनिधी
शहरात जिल्हा दूध संघाचे दूध आणणाऱ्या दोन वाहनांना एका डंपरने धडक दिल्याने या तिहेरी अपघातात १ ठार तर तीन जखमी झाल्याचे वृत आहे. या अपघातात गाडी मालक सुनील पाटील(रा.पोलीस कॉलनी) यांचा मृत्यू झाल्याची खात्रीलायक वृत्त आहे
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून भुसावळकडे जिल्हा दूध संघाचे दोन वाहनांना एका डंपरने धडक दिल्यामुळे एक ठार तर तीन जण जखमी झाले आहे. हा अपघात भुसावळातील नवोदय विद्यालयाच्या समोर झाला असून हा अपघात इतका भीषण होता की त्या अपघाताचा आवाज येवून परिसरातील नागरिक एकत्र येत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे पुन्हा राष्ट्रीय महामार्ग अजून किती नागरिकांचा जीव घेईल हा प्रश्न उपस्थित होत आहे.